विज्ञापन बंद करने के लिए क्लिक करें

MPSC Current Affairs 2022 | MPSC चालू घडामोडी in Marathi, Ques/Ans PDF

MPSC Current Affairs 

MPSC Current Affairs 2022 is one of the most important sections in any MPSC exam. Candidates who are going to appear for prelims / main exam can check latest MPSC Current Affairs 2022 from this page. Check MPSC Current Affairs in Marathi and English from here!!

recruitmentresult.com

Here we have provided MPSC Current Affairs Question / Answers PDF also for your comfort. So, candidates who are preparing for the MPSC examination are suggested to check MPSC चालू घडामोडी Paper in Marathi by going through this page.

MPSC Current Affairs

MPSC चालू घडामोडी in Marathi

ऑनलाइन सातबारासाठी बँकांशी करार:

 • सातबारा ऑनलाइन पद्धतीने काढण्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दीड कोटी लोकांनी ऑनलाइन दाखले मिळवले.
 • त्यामुळे आता शेतकऱ्यांना सातबारासाठी त्रास होऊ नये यासाठी बँकांशी करार केला जाणार आहे.
 • बँका व्यवहारासाठी सातबारा डाऊनलोड करून घेऊ शकतील.
 • तर याच पद्धतीने ई-पीक पाहणीच्या अभिनव उपक्रमातून सरकारकडे मोठी माहिती (डाटा) संकलित झाली आहे.
 • तसेच त्याचा वायदे बाजारात मोठा उपयोग होऊ शकतो. हा मौल्यवान डाटा वायदे बाजारासाठी उपलब्ध करायचा की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धात हम्पी सहाव्या स्थानी:

 • गतविजेत्या कोनेरू हम्पीला ‘फिडे’ जागतिक जलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटात सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
 • तर खुल्या गटात युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने चांगली कामगिरी करताना नववे स्थान मिळवले.
 • तसेच खुल्या गटात उझबेकिस्तानच्या नोदिर्बेक अब्दुसात्तोरोव्हने5 गुणांसह विजेतेपद पटकावले.
 • त्याच्यात आणि नवव्या स्थानावरील गुकेशमध्ये केवळ अध्र्या गुणाचा फरक होता.

अफगाणिस्तानच्या अशरफ घनींचा ‘सर्वात भ्रष्टलोकांच्या यादीत समावेश:

 • अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांचा जगातील सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) नावाच्या संस्थेने ही यादी तयार केली आहे.
 • ओसीसीआरपी हे जगभरातील स्वतंत्र मीडिया आउटलेट्ससाठी एक ना-नफा शोधात्मक बातम्यांचे अहवाल देणारे व्यासपीठ आहे.
 • दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मित्राला ‘करप्ट पर्सन ऑफ द इयर’पुरस्कार मिळाला आहे.
 • बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना या यादीत पहिले स्थान मिळाले आहे.
 • तर या यादीत सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद, टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन आणि ऑस्ट्रियाचे चांसलर सेबॅस्टियन कुर्झ यांचा समावेश करण्यात आला आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धाचा पृथ्वी शॉ मुंबईचा कर्णधार:

 • रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी मुंबईचे नेतृत्व धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
 • 41 वेळा रणजी विजेत्या मुंबईचा एलिट क-गटात समावेश आहे.
 • मुंबईची सलामी 13 जानेवारीपासून महाराष्ट्राशी रंगणार आहे, तर दुसरी लढत 20 जानेवारीपासून दिल्लीशी आहे.
 • मुंबईच्या संघात अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरेसह सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खान, अरमान जाफर, आकर्शित गोमेल आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी स्थान मिळवले आहे.

या मोठ्या शहरांमध्ये सुरू होणार ‘5G’ सेवा :

 • गुरूग्राम, बेंगळुरू, कोलकाता, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणेसह काही मेट्रो आणि मोठी शहरं पुढील वर्षी 5G सेवा मिळवणारे पहिली ठिकाणं असतील.
 • मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे.
 • तर या वर्षी सप्टेंबरमध्ये, दूरसंचार क्षेत्रातील नियामक TRAI कडून राखीव किंमत, बँड योजना, ब्लॉक आकार, स्पेक्ट्रमचे प्रमाण या संदर्भात स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी शिफारसी मागवल्या.
 • तसेच ट्रायने तिच्या बाजूने उद्योग भागधारकांशी या विषयावर सल्लामसलत सुरू केली आहे.
 • 5G सेवांच्या रोलआउटच्या संदर्भात, दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) – भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया यांनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड येथे 5G चाचणी साइट्स स्थापन केल्या आहेत.

आरोग्य सुविधांमध्ये केरळ अव्वल :

 • आरोग्य व्यवस्थेसंदर्भातील कामांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या सर्वोत्तम राज्यांच्या यादीमध्ये केरळने बाजी मारलीय.
 • तर मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या राज्यांमध्ये केरळ अव्वल तर काही महिन्यांमध्ये निवडणुका येऊ घातलेलं उत्तर प्रदेश राज्य तळाशी आहे.
 • केंद्र सरकारच्या निती आयोगाने तयार केलेल्या हेल्थ इंडिक्सच्या चौथ्या अहवालामधून ही माहिती समोर आलीय.
 • तसेच हा अहवाल तयार करताना सन 2019-20 दरम्यानच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे.
 • भारत सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या निती आयोगाने तयार केलेल्या या अहवालामध्ये तामिळनाडू आणि तेलंगण ही दाक्षिणात्य राज्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • छोट्या राज्यांचा विचार केला असता मिझोरम हे सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य ठरलं असून अभूतपूर्व सुधारणेच्या बाबतीतही मिझोरमनेच बाजी मारलीय.

60 वर्षावरील नागरिकांना मिळणार बूस्टर डोस :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली.
 • तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते.
 • तर आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह 60 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते.
 • दरम्यान, आता 60 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धात भरतकोटीने पराव्यानला रोखले :

 • भारताचा ग्रँडमास्टर हर्षां भरतकोटीने ‘फिडे’ जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत त्याच्यापेक्षा वरच्या स्थानावर असलेला रशियाचा ग्रँडमास्टर डेव्हिड पराव्यानला बरोबरीत रोखले.
 • तर खुल्या गटातील सहाव्या फेरीत 21 वर्षीय भरतकोटी आणि पराव्यान यांच्यातील लढत 42 चालींनंतर बरोबरीत सुटली.
 • त्याआधी भरतकोटीने रौफ मामेदोव्ह, व्लादिस्लाव्ह कोव्हालेव्ह आणि व्होल्दोमेर यांच्यावर विजयांची नोंद केली होती.
 • तसेच त्याने सर्गे मोवेसीनला बरोबरीत रोखले होते.
 • भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजरथीला मात्र पराभव पत्करावा लागला.

दिनविशेष:

 • सन 1836 मध्ये स्पेनने मेक्सिको या देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
 • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राजकीय पक्ष सन 1846 मध्ये स्थापन झाला.
 • प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेयरमन ‘धीरूभाई अंबानी‘ यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता.
 • टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला.
 • सन 1948 मध्ये मुंबई मध्ये कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.

मतदार ओळखपत्राला आधारजोड निवडणूक कायदादुरुस्ती लोकसभेत मंजूर :

 • मतदार ओळखपत्र ‘आधार’ क्रमांकाशी जोडणारे वादग्रस्त ‘निवडणूक कायदा दुरुस्ती’ विधेयक सोमवारी लोकसभेत केवळ 27 मिनिटांत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
 • बनावट मतदारांची नावे काढून टाकण्यासाठी ही दुरुस्ती गरजेची असल्याचा युक्तिवाद रिजिजू यांनी केला.
 • तर या कायदादुरुस्तीमुळे निवडणूक कायदा दुरुस्ती विधेयकाद्वारे मतदारांचे निवडणूक ओळखपत्र आता त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडले जाणार आहे.
 • तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचे नाव मतदारयादीत समाविष्ट केले जाते, पण ही प्रक्रिया वर्षभरात एकदा जानेवारीमध्ये होत असे. ती आता जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये केली जाईल.
 • त्यामुळे नव्या मतदारांना यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही.
 • पुरुष ‘सर्व्हिस व्होटर’ना त्यांच्या वतीने मतदान करण्यासाठी पत्नीला नामांकित करता येते मात्र, आता या पर्यायात पत्नीलाही आपल्या पतीला नामांकित करता येईल. ‘वाईफ’ याऐवजी ‘स्पाऊज’ असा शब्दप्रयोग केला जाईल.

प्रदीप कुमार रावत भारताचे चीनमधील नवे राजदूत:

 • ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी प्रदीप कुमार रावत यांची भारताचे चीनमधील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर ते विक्रम मिस्री यांची जागा घेणार आहेत.
 • भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) 1990 सालच्या तुकडीचे अधिकारी असलेले रावत हे सध्या नेदरलॅण्ड्समध्ये भारतीय राजदूत म्हणून कार्यरत आहेत.
 • तसेच पूर्व लडाखच्या सीमेवरील तिढा रेंगाळत असतानाच रावत यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी त्यांनी हाँगकाँग व बीजिंगमध्ये काम केलेले आहे.
 • सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2020 या काळात ते इंडोनेशिया व तिमोर-लेस्ते या देशांमध्ये भारताचे राजदूत होते.

उत्तर प्रदेशात 1 कोटी विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन, टॅब्लेट :

 • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यातील अंतिम वर्षाच्या सुमारे 1 कोटी विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन आणि टॅब्लेट वितरित करणार आहेत.
 • तर या योजनेचा पहिला टप्पा दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या मुहूर्तावर, 25 डिसेंबरला सुरू होणार आहे.
 • तसेच मुलींसह प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थी 25 डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील आणि योगी आदित्यनाथ हे यावेळी युवकांना 60 हजार स्मार्टफोन आणि 40 हजार टॅबलेट वितरित करतील, असे निवेदनात नमूद केले आहे.
 • एम.ए., बी.ए., बी.एस्सी., आयटीआय, एमबीबीएस, एम.डी., बी. टेक. व एम. टेक. यांसह इतर काही अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना यात प्राधान्य दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात नवा कामगार कायदा 2022-23 आर्थिक वर्षापासून लागू होणार :

 • देशात नवा कामगार कायदा 2022-23 या आर्थिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे.
 • तर नव्या कामगार कायद्यात आठवड्याला 4 दिवस काम आणि तीन दिवसांची सुट्टी असणार आहे.
 • मात्र कर्मचाऱ्यांना दिवसाला 12 तास काम करावं लागणार आहे. कारण आठवड्याला 48 तास काम ही मर्यादा तशीच ठेवली आहे.
 • नव्या कायद्यामुळे रोजगार आणि कार्यपद्धतीवर संबंधित व्यवस्थेत बदल होतील. कर्मचाऱ्यांचे पगार, कामाचे तास आणि आठवड्यांच्या दिवसांची संख्या यावर सर्व अवलंबून असणार आहे.
 • केंद्र सरकारने या आधीच या कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. आता राज्यांना त्यांच्या बाजूने मसुदा करणं आवश्यक आहे.

दिनविशेष:

 • सन 1913 मध्ये ‘ऑर्थर वेन‘ यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
 • भारताचे 17वे सरन्यायाधीश ‘पी.एन. भगवती‘ यांचा जन्म 21 डिसेंबर 1921 रोजी झाला.
 • भारतीय लेखक, कवी तसेच समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 मध्ये झाला होता.
 • ‘रघुनंदन स्वरूप पाठक‘ यांनी सन 1986 मध्ये भारताचे 18वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.

Agreement with banks for online Satbara:

 • Satbara online response is getting good response. One and a half crore people got certificates online.
 • So now an agreement will be made with the banks so that the farmers do not have to suffer for Satbara.
 • Banks can download Satbara for transactions.
 • So in the same way, big data has been collected by the government through the innovative initiative of e-crop survey.
 • It can also be of great use in the futures market. It is yet to be decided whether this valuable data will be made available in the futures market, said Revenue Minister Balasaheb Thorat.

Hampi finished sixth in the World Fast Chess Championship:

 • Past champion Koneru Hampi finished sixth in the women’s group at the FIDE World Fast Champion Championships.
 • In the open group, the young Indian Grandmaster D. Gukesh finished ninth with a good performance.
 • Also in the open group, Nodirbek Abdusatorov of Uzbekistan won the title with 9.5 points.
 • The difference between him and Gukesh in ninth place was only half a point.

Afghanistan’s Ashraf Ghani named ‘most corrupt’:

 • Former Afghan President Ashraf Ghani has been named one of the most corrupt leaders in the world.
 • The list is compiled by an organization called the Organized Crime and Corruption Reporting Project (OCCRP).
 • OCCRP is a non-profit investigative news reporting platform for independent media outlets around the world.
 • Meanwhile, a friend of Russian President Vladimir Putin has been named Corrupt Person of the Year.
 • Belarusian President Alexander Lukashenko tops the list.
 • The list includes Syrian dictator Bashar al-Assad, Turkish President Recep Tayyip Erdogan and Austrian Chancellor Sebastian Kurz.

Prithvi Shaw captains Mumbai in Ranji Trophy cricket tournament:

 • For the first two matches of the Ranji Trophy, Mumbai will be led by opener Prithvi Shaw.
 • वेळा 41-time Ranji Trophy winners Mumbai are in Elite C-Group.
 • Mumbai’s opener will be against Maharashtra from January 13, while the second match will be against Delhi from January 20.
 • Mumbai’s veteran wicketkeeper-batsman Aditya Tare, opener Yassvi Jaiswal, middle-order batsmen Sarfaraz Khan, Arman Jaffer, Akarshit Gomel and all-rounder Shivam Dubey have been named in the Mumbai squad.

The 5G service will be launched in these big cities:

 • मेट Some metros and major cities including Gurugram, Bengaluru, Kolkata, Mumbai, Delhi, Ahmedabad, Hyderabad and Pune will be the first places to get 5G services next year.
 • The government plans to hold a spectrum auction for 5G in March-April 2022.
 • So, in September this year, the telecom regulator TRAI invited recommendations for auction of spectrum in terms of reserve price, band scheme, block size, spectrum ratio.
 • Troy has also started consulting with industry stakeholders on her behalf.
 • Regarding the rollout of 5G services, Telecommunication Service Providers (TSPs) – Bharti Airtel, Reliance Jio and Vodafone Idea have set up 5G test sites at Gurugram, Bangalore, Kolkata, Mumbai, Chandigarh.

MPSC Important Links

MPSC Notification MPSC Question Paper
MPSC Syllabus MPSC Online Test
MPSC Eligibility Criteria MPSC Time Table
MPSC Result MPSC Admit Card
MPSC Cut Off MPSC Answer Key

MPSC चालू घडामोडी Paper in Marathi

Question 1: कोणत्या दिवशी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा करतात?

 1. 1 फेब्रुवारी
 2. 4 फेब्रुवारी
 3. 3 फेब्रुवारी
 4. 2 फेब्रुवारी

Answer: 4 फेब्रुवारी

Question 2: कोणत्या ठिकाणी भारतातले पहिले ‘अॅम्पुटी क्लिनिक’ उघडण्यात आले?

 1. बंगळुरू
 2. दिल्ली
 3. चंदीगड
 4. भूमुंबई

Answer: चंदीगड

Question 3: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग याचे मुख्यालय कुठे आहे?

 1. बंगळुरू
 2. नवी दिल्ली
 3. कोलकाता
 4. नोएडा

Answer: नवी दिल्ली

Question 4: खालीलापैकी कोणत्या उद्यान/प्रकल्पाने’ २०१६ चे भारत जैवविविधता पारितोषिक’ (India Biodiversity Award) मिळविलेले आहे ?

 1. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उ.प्र.)
 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम)
 3. रणथम्भौर राष्ट्रीय उद्यान (राजस्थान)
 4. पक्के व्याघ्र प्रकल्प (अरुणाचल प्रदेश)

Answer: पक्के व्याघ्र प्रकल्प (अरुणाचल प्रदेश)

Question 5: ‘द मेंकिंग ऑफ द महात्मा’ (The Making of the Mahatma ) चे निर्देशक कोणी केले.

 1. सत्यजित रे
 2. मृणाल सेन
 3. रिचर्ड अटनबरो
 4. श्याम बेनेगल

Answer: श्याम बेनेगल

Check Here – Online Quiz for Competitive Exam

Question 6: खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

 1. संस्कृत हि भारताची पहिली अभिजात भाषा आहे
 2. तमिळ हि भारताची दुसरी अभिजात भाषा आहे
 3. भारत सरकारने २००८ मध्ये कन्नड आणि तेलगु या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या
 4. २०१५ मध्ये मराठी भाषेलादेखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे

Answer: भारत सरकारने २००८ मध्ये कन्नड आणि तेलगु या भारताच्या अभिजात भाषा म्हणून घोषित केल्या

Question 7: राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?

 1. ९७ वी
 2. ९८ वी
 3. ९९ वी
 4. १०० वी

Answer: ९९ वी

Question 8: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिल्या ‘हरित रेल्वे कॉरीडॉर’ चे उद्घाटन केले आहे?

 1. जम्मू काश्मीर
 2. झारखंड
 3. तामिळनाडू
 4. महाराष्ट्र

Answer: तामिळनाडू

Question 9: ८८ व्या ऑस्कर पारितोषिका (२०१६) बाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

 1. लिओनार्डो डिकाप्रियो-सर्वोत्कृष्ट अभिनेता ‘रूम ‘ साठी
 2. ब्री लार्सन -सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ‘द डनिश गर्ल’ साठी
 3. अलेजान्ड्रो इनारव्हिटा -सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ‘स्पॉटलाईट ‘साठी
 4. मार्क रेलान्स-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ‘ब्रिज ऑफ स्पाईज’ साठी

Answer: मार्क रेलान्स-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ‘ब्रिज ऑफ स्पाईज’ साठी

Question 10: कोणत्या मिसाईल निर्देशित विध्वंसक युध्दनौकेचे मुंबईत १७ सप्टेंबर २०१६ ला जलावतरण करण्यात आले?

 1. जेडीएस कोंगो
 2. कनर्मिंग
 3. फारबीन
 4. मोरमुगाओ

Answer:  मोरमुगाओ

Get HereLatest Current Affairs Updates

Question 11: भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?

 1. ओरिसा
 2. बिहार
 3. तामिळनाडू
 4. उत्तर प्रदेश

Answer: उत्तर प्रदेश

Question 12: म्यानमारमध्ये २०१५ च्या राष्ट्रीय निवडणुकानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संसदेतील….टक्के जागा स्वत:करताच राखून ठेवल्या आहेत .

 1. २०
 2. २५
 3. ३३
 4. ५०

Answer: २५

Question 13: परिघाच्या संदर्भात पुढील बॉल उतरत्या क्रमात लावा.

अ)व्हॉलीबॉल ब) बेसबॉल

क)बास्केटबॉल क)हडबॉल

 1. क,अ,ड,ब
 2. अ,ड,ब,क
 3. ड,क,अ,ब
 4. क,ड,अ,ब

Answer: क,अ,ड,ब

Question 14: खालील विधाने विचारात घ्या:

अ)विद्यादेवी भंडारी या नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत .

ब)विद्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षा होत्या.

क)विद्यादेवी भंडारी यांनी या अगोदर संरक्षणमंत्री म्हणून कार्य केलेले आहे.

 1. अ आणि क
 2. अ आणि ब
 3. ब आणि क
 4. अ, ब आणि क

Answer: अ आणि क

Question 15: युरोपियन युनियन शैलीवर आधारित गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली आहे ?

 1. आशियान इकॉनॉमिक कम्युनिटी
 2. आशियान इकॉनॉमिक युनियन
 3. आशियान सोशो इकॉनॉमिक कम्युनिटी
 4. आशियान सोशो इकॉनॉमिक कॉन्सील

Answer: आशियान इकॉनॉमिक युनियन

Also Check –Entrance Exam in India

Question 16: खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘भारतीय हत्ती’ हा आपला ‘राज्य प्राणी’ म्हणून घोषित केलेला नाही ?

 1. केरल
 2. तामिळनाडू
 3. कर्नाटक
 4. झारखंड

Answer: तामिळनाडू

Question 17: 5 डिसेंबर 2015 हा जगभर जागतिक मृदा दिवस (world soil day) म्हणून साजरा केला गेला. २०१५ च्या या दिवसाचे घोषवाक्य होते.

 1. सॉंइल्स अ सॉलिड ग्राउंड फॉर लाईफ
 2. सॉंइल्स मस्ट फॉर लाईफ
 3. सॉंइल्स अ नरीशमेंट फॉर लाईफ
 4. नो लाईफ विदाऊट सॉंइल्स

Answer: सॉंइल्स अ सॉलिड ग्राउंड फॉर लाईफ

Question 18: ‘टाइम’ मगझीनने भारतीय लेखिका शोभा डे यांचा उल्लेख भारताची जकी कॉलीन्स असा केला होता. जकी कॉलीन्स इतक्यात निवर्तल्या. त्यांच्या एका पुस्तकावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत बंदी घालण्यात आली होती व ते त्यांचे पहिले पुस्तकही होते ते कोणते ?

 1. दे वर्ल्ड इज फुल ऑफ मरीड मेन
 2. हॉलीवूड वाइव्ज
 3. हॉलीवूड हजबड्स
 4. हॉलीवूड डिव्होर्सस

Answer: दे वर्ल्ड इज फुल ऑफ मरीड मेन

Question 19: एस.बी.आय.म्युच्यअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 1. इंद्रा नुयी
 2. अनुराधा राव
 3. मेग बिटमेन
 4. मेरी

Answer: अनुराधा राव

Question 20: इतक्यात ओमर शरीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ते हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले.त्याच्याबाबत काय खरे नाही ?

 1. ते डॉक्टर झिवगो म्हणून स्मरणात राहतात
 2. उत्कृष्ट ब्रिज प्लेअर म्हणून ओळखले जात
 3. त्यांना अल्झेमरस (स्मुर्तीभ्रंश)झाला होता
 4. ते मकेनाज गोल्डमधील मकेना होते

Answer: ते मकेनाज गोल्डमधील मकेना होते

Press HereMPSC चालू घडामोडी Paper in Marathi

MPSC Current Affairs PDF

Maharashtra PSC Current Affairs covers all the recent updates related to the politics, education, science, sports, money, banking. So if you are preparing for any MPSC Competitive Examination like Maharashtra Group-C Services Exam, Subordinate Service Exam, Engineering Services Exam, State Service Main Examination, Forest Service Examination etc then you must check the Maharashtra public service commission current affairs 2022.

Also, get latest updates from MPSC Current Affairs Books, MPSC Current Affairs Magazine or you may take help from the news application or news channel, newspaper etc. We have provided MPSC previous year question answer of the general knowledge in the form of PDF in the above section of this page. You can download it by pressing the given link.

Something That You Should Put An Eye On

Upcoming Government Jobs Employment News This Week
Best Career Opportunities Person In News Current Affairs
Interview Preparation Tips Latest Recruitments

1 thought on “MPSC Current Affairs 2022 | MPSC चालू घडामोडी in Marathi, Ques/Ans PDF”

Leave a Comment

Scroll to Top